मुधोजी हायस्कूलच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा विधान भवनात सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | फलटण एज्युकेशन सोसायटी आणि मुधोजी हायस्कुल यांचे शिक्षण प्रसाराचे कार्य शंभर पेक्षा अधिक वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे. शालांत परीक्षा 1990 तुकडीच्या उल्लेखनीय कार्यातून सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेची उभारणी करावी. अशा संस्थात्मक कार्य उभारणीतून नव्या पिढीचे भविष्य घडविले जावे, संकटग्रस्ताचे अश्रू पुसले जावेत आणि गरजवंताना दिलासा मिळावा. अशी अपेक्षा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केले.

विधान भवन, मुंबई येथे आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते मुधोजी हायस्कुल, (ता. फलटण जि.सातारा) येथील 1990 च्या इयत्ता 10 वी तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संस्थेने, आपापल्या क्षेत्रात उच्चापदावर पोहचवलेल्या सह –अध्यायींचा सत्कार आयोजित केला. त्याप्रसंगी सत्कारमूर्ती आणि उपस्थितांना संबोधित करतांना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेद्र भागवत , मीरा भाईदर महानगरपालिका आयुक्त, दिलीपराव ढोले,निवृत्त सह सचिव भाई मयेकर, माऊली फाऊंडेशन काळबादेवीचे अध्यक्ष डॉ. सिंगन, मोहनभोसले, प्रसन्न रुद्रवते ,सभापती यांचे सचिव महेंद्र काज, साठे व रुईया कॉलेजचे प्राध्यापक. चंद्रशेखर नेने, मनोज माने, समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

विधान भवनातील, मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कौटुंबिक परंतु आगळ्यावेगळ्या समारंभामुळे उपस्थित फलटणकरांसह सर्वांच्याच मनात आनंदाचा ठेवा बनून राहिलेल्या शालेय जीवनातील स्मृर्तीना उजाळा मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता खाडे-ढोले, मुंबई उच्च न्यायालयात वकीलीची 23 वर्षे पूर्ण केलेले ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे, तसेच श्रीमती विजया गाडे –सांगळे यांचे सुपुत्र आणि भारतातील पहिला विगन टेनिसपटू विश्वजित सांगळे यांचा “ स्नेहदर्पन” पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्तीना शाल,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या समारंभामुळे समाजकार्यात आणखी मोठे योगदान देण्याची प्ररेणा आणि बळ आम्हांला प्राप्त झाले अशी भावना सत्कारमूर्तीनी व्यक्त केली. या कार्यक्रमास नसीर शिकलगार, असीम तांबोळी , अमोल जोशी, मनिष निंबाळकर, किरण बोळे, श्रीमती शर्मिला चव्हाण, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, संचालक निलेश मदाने, संजय खानोलकर यांच्यासह मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी विद्यार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.