औरंगाबाद – एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाला जवळपास महिना उलटला आहे. अशातच शुक्रवारी परिवनहन मंत्र्यांनी मेस्मा कायदा लावण्याचे सूतोवाच केले. मात्र तरीही कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मेस्मा लावा, अटक करा आणखी काहीही करा अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांची घेतली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/461295628753942/
एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील २४ दिवसांपासून संप पुकारलेला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीची लाट पसरलेली आहे. या थंडीतही कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. शासनातर्फे वारंवार संप मागे घ्यावा यासाठी आवाहन केले जात आहे. व्यवस्थापकीय संचालकांसह विविध वरिष्ठ अधिकारीही संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही कर्मचारी माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळेच शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मेस्मा कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासनातर्फे आता कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. असे असले तरीही आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांची भूमिका ठाम आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातील आंदोलनकर्त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशासनाने कुठलीही कारवाई करावी आम्ही विलनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.