एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारची भूमिका असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. “सरकारनं दोन पावलं पुढं यायला हवं मात्र सरकार पुढं येत नाही. एका उपोषणकर्त्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याऐवजी त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढावा, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधीपक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केले. तरी देखील सरकारनं दोन पावलं पुढं यायला हवं होत. मात्र, सरकार पुढं येत नाही. सरकारच्या संवेदना हरवल्या आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे. सरकारने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे.

यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यासह काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, सामनाचे संपादक आणि सामनाचे नेते आता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी झाल्या आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

You might also like