हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी सूर्यास्त होताच,आपल्याला एप्रिलचा सर्वात सुंदर खगोलीय कार्यक्रम पहायला मिळेल.आकाशात उल्का वर्षावामुळे फटाक्यांच्या आतषबाजी झाल्या सारखे आभाळ दिसून येईल. खगोलशास्त्रज्ञ बर्याच वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होते.
ही रात्र विशेष आहे
१६ ते २६ एप्रिल दरम्यान उल्केच्या सरी पाहिल्या जातील,परंतु बुधवारी रात्री हि विशेष आहे.या रात्री कुशीत जास्त उल्का वर्षाव होईल.२३ एप्रिलला अमावस्या असल्याने २२ एप्रिलच्या रात्री चंद्र चक्क उशीरा आकाशात दिसेल.यामुळे उल्का वर्षाव सहजपणे दिसू शकेल. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून हे दृश्य खूपच सुंदर आहे.
हा उल्का वर्षाव आपल्याला लीरा स्टार समूहाच्या वेगा तारकाच्या बाजूने येत असल्याचे दिसतो,म्हणूनच त्याला लिरिड्स उल्का वर्षाव म्हणतात.
नंबर गेम
या उल्का वर्षावात दर तासाला २० ते २५ उल्का पाहिले जाऊ शकतात
एका तासात जवळपास ९० उल्का आपल्याला दिसतील
रात्री ९.०० वाजता लिरिड्स उल्का वर्षाव ईशान्य दिशेच्या क्षितिजास उगवेल
रात्री ९:३० ते सकाळी साडेचार ही वेळ ते पाहण्यासाठी उत्तम वेळ असेल
पहाटे साडेचार वाजता उल्का वर्षाव डोक्याच्या वरच्या बाजूस येईल
४९ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने उल्का पृथ्वीच्या दिशेने येतील
इंदिरा गांधी नक्षत्रांचे वैज्ञानिक अधिकारी सुमित श्रीवास्तव यांनी सांगितले की, २८ एप्रिल रोजी आपण एक लहान उल्का वर्षाव स्कॉर्पिड्स पाहु.ती वृश्चिक राशीतील असल्याचे दिसत असल्याने त्याला स्कॉर्पिड्स असे म्हणतात. यात एका तासामध्ये जास्तीत जास्त पाच उल्का दक्षिण-पूर्व दिशेकडे जाताना दिसतील.हा उल्का वर्षाव २० एप्रिल ते १९ मे दरम्यान दिसतील.
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.