सातारा जिल्ह्यात “या” भागात गारपिटासह पावसाची शक्यता : हवामान खात्याचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील काही भागात येत्या काही वेळात जोरदार गर्जनेसह वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडणार असून हवामानात गारवा येणार आहे. पुढील काही तासांतच पाऊस होण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, मेढा व कोयना या परिसरात जोरदार गर्जनेसह पाऊस होणार आहे. यावेळी वादळी वारे वाहणार असून जोरदार पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कमालीचे वातावरण तापलेले आहे. त्यामुळे काही वेळा गारपीटासह पावसाने हजेरी लावलेली होती. मंगळवारी (दि. 4 मे) गारपीटाचा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा👉🏽 http://bit.ly/3t7Alba

You might also like