Tuesday, February 7, 2023

गांजा न मिळाल्याने व्यसनी मुलाची वयोवृद्ध आई वडीलांना मारहाण; पोलिस कारवाई करणार का?

- Advertisement -

औरंगाबाद | लाॅकडाऊन मध्ये सर्वत्रच पैशाची तंगी असल्याकारणाने व्यसनाधीन लोकांची तारांबळ उडत आहे. दारू लाॅकडाऊनच्या काळत छुप्या पद्धतीने चारपट जास्त दराने मिळत आहे. दारु मिळत नसल्याने व्यसनाच्या अधीन गेलेल्या लोकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. यातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असाच प्रकार औरंगाबाद शहरातही घडत आहे. गांजा मिळत नसल्याने व्यसनाधिन तरुणाने आपल्या जन्मदात्या वयोवृद्ध आई वडीलांनाच मारहान केल्याचा धक्कादायल प्रकार घडला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील पवना नगर परिसरामधील रहिवासी असलेले संपद कल्याणकर (वय 69) यांच्या मुलाला मागील काही वर्षांपादून गांजाचे व्यसन जडले आहे. मुकुंद कल्याणकर वय (31) असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. लाॅकडाऊन मुळे सध्या त्याला गांजा मिळत नसल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यातून तो चक्क जन्मदात्या आई वडिलांना मारहाण करत असल्याचं समोर आलंय. याबाबत सदर तरुणाचे वडील संपद कल्याणकर यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना माहिती दिली आहे.

- Advertisement -

सदर घटनेबाबत संपद कल्याणकर यांनी सिडको पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर सिडको पोलीस स्टेशनने तो वेडा आहे. आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही असं सांगितल्याचं कल्याणकर यांनी म्हटले आहे. त्यानंतर आपण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात व्यथा मांडली असता न्यायालयाने सदर तरुणाला आमच्यासमोर हजर करा असे सांगितल्याचे कल्याणकर म्हणालेत. मात्र सदर तरुणाला न्यायालयापर्यंत घेऊन जाणे वयोवृद्ध आई वडीलांना कठीण जात आहे.

दरम्यान, अशा केसमध्ये आरोपीला न्यायालयापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असते. मात्र पोलिसांनी अद्यापही काही कारवाई केलेली नाही. त्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीने जर त्या वयोवृद्ध जोडप्याला काही हानी पोहोचवली तरी त्याला जबाबदार कोण असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे. यावर औरंगाबाद पोलिस काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.