कराड | राज्यातील इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा एम. एच. सीइटीचा निकाल जाहीर झाला. यावर्षीच्या एम. एच. सीइटी परीक्षेमध्ये 90 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 10 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये 99.83 % गुण मिळवून प्रथम क्रमांक आलेला आहे. 85 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 12 विद्यार्थी आहेत. 80 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 2 विद्यार्थी आहेत. 75 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 7 विद्यार्थी आहेत. 79 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 2 विद्यार्थी आहेत. 60 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 1 विद्यार्थी आहेत. तसेच जेईई पेपर टू या आर्किटेक्चर च्या परीक्षेत देशात 428 वा नंबर एका विद्यार्थ्याने मिळवला आहे.
तसेच मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नीट या परीक्षेमध्ये कोटा अकॅडमी कराड येथील 25 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये 621 गुणांचा प्रथम क्रमांक आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षीही कोटा अकॅडमिच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे, असे कौतुक कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कोटा अकॅडमी व कोटा जुनियर कॉलेज ऑफ सायन्सचे संचालक डॉ. महेश खुस्पे व सौ. मंजिरी खुस्पे यांनी अभिनंदन केले. गेली 17 वर्षे कोटा अकॅडमी कराड येथे इंजिनिअरिंगला तसेच मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट या परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे व सौ. मंजिरी खुस्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कोटा अकॅडमीचे आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग व मेडिकलला जाण्यासाठी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे, सौ. मंजिरी खुस्पे, मैथिली खुस्पे कोटा जुनियर कॉलेजच्या प्राचार्या जयश्री पवार सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.