मुंबईत मिळणार स्वस्त घरे; MHADA चा मोठा निर्णय

mumbai mhada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई एक जागतिक दर्जाचे शहर असून, विविध संस्कृती, संधी आणि जीवनशैलीच्या विविध अंगांनी भरलेले आहे . त्यामुळे ते सर्वांचे आकर्षण स्थान बनले आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आपलं स्वतःच घर असावं , असे बऱ्याच लोकांना वाटत असते. पण घराच्या वाढत्या किमतीमुळे अशा ठिकाणी घर घेणे एक स्वप्नच राहते. या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडून एक आनंदाची बातमी जाहीर झाली आहे. म्हाडाने 2030 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात 8 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

घरांच्या किमतींमध्ये घट करण्याचा निर्णय –

म्हाडा बोर्डाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरेकर यांनी सांगितले की, म्हाडाने परवडणाऱ्या घरांच्या किमतींमध्ये 30 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी घर घेणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास भरारी मिळणार आहे. भारत सरकारच्या नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाला गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून घोषित केले आहे. 2030 पर्यंत या भागात 30 लाख परवडणाऱ्या घरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यातील 8 लाख घरे म्हाडाच्या वतीने बांधली जाणार आहेत.

पुनर्विकास प्रकल्पांना गती –

मुंबईत 2000 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. याशिवाय 114 सरकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. तसेच या निर्णयामुळे विविध क्षेत्रालाही गती मिळणार आहे. मुंबईतील आकाशाला टेकलेल्या घरांच्या किमतींमुळे सर्वसामान्य लोकांसाठी घर घेणे कठीण झाले होते , पण म्हाडाच्या या योजनांमुळे अनेकांना परवडणाऱ्या किमतीत घर मिळण्याचा एक सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाला आहे.

सर्वसामान्यांचा आशेचा किरण –

या योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरु होणार असून , या निर्णयामुळे मुंबई तसेच त्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांची स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत. हि योजना सर्वसामान्य जनतेला आशेचा किरण ठरला आहे. याच्या माध्यमातून लोक आपली अंगाशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करू शकणार आहेत.