हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mhada Lottery 2025 । सर्वसामान्यांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडाने तब्बल २००० घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. सर्वसामान्यांना कमी किमतीत घरे खरेदी यावीत यासाठी म्हाडा कडून ठाणे विभागात हि सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या शेजारी आणि एका मोठ्या महानगर पालिकेत तुम्हीही हक्काचं घर खरेदी करू शकता. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सध्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेच्या अंतर्गत घरांची विक्री सुरू आहे. पण आता नव्याने घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
जाहिरात कधी प्रसिद्ध होणार ? Mhada Lottery 2025
2000 घराच्या सोडती बाबत (Mhada Lottery 2025) ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. महत्वाची बाबा म्हणजे ही घरे मुंबई जवळ ठाणे, कल्याण, शीळ, विरार परिसरात आहेत. त्याची प्रक्रिया म्हाडाकडून सुरू करण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेश गृहयोजनेतील काही घरे उपलब्ध झाली आहेत. पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील काही घरे पूर्ण झाली आहेत. ऑगस्टमध्ये सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, ज्यात अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश असेल. म्हाडाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचं हक्काचं घर खरेदीचं स्वप्न साकार होणार आहे. कोकण मंडळातील विरार- बोळींज, खोणी, शिरढोणसह अन्य ठिकाणच्या घरांची काही कारणांमुळे विक्री झाली नव्हती. त्यामुळे आता या घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत आणि ‘बुक माय होम’ संकल्पनेनुसार केली जात आहे.
दरम्यान, म्हाडाने यापूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरी अंतर्गत अवघ्या ५ लाख रुपयांत तुम्हाला घर मिळू शकते. मात्र अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) लोकांनाच ५ लाखात घर खरेदीची संधी असणार आहे. म्हाडाच्या लॉटरी (Mhada Lottery 2025)अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे.




