Mhada Mumbai : मुंबईत 24 लाखांमध्ये मिळणार 1BHK ; म्हाडा करणार घरांची विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mhada Mumbai : सध्याच्या महागाईच्या जमान्यात घरं घेणं म्हणजे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यातही मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये घरं घेणे म्हणजे तीनदा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण सामान्य माणसाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा नेहमीच पुढाकार घेत असते. म्हाडाकडून परवडणाऱ्या किमतींमध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात. जर तुम्ही देखील मुंबईच्या (Mhada Mumbai) आसपास बजेटमध्ये घर घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण मुंबई नजीकच्या भागात केवळ २४ लाखांमध्ये घर खरेदी करण्याची संधी म्हाडाकडून मिळते आहे. चला जाणून घेऊया म्हाडाच्या या स्कीम बद्दल…

मिळालेल्या माहितीनुसार सोशल मिडीयावर म्हाडाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार सोडतीतून प्रतिसाद न मिळालेली किंवा विक्रीशिवाय पडून राहिलेल्या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने (Mhada Mumbai) महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत आता विरार – बोळींज येथील घरांची विक्री करण्यास म्हाडा सज्ज असल्याचे म्हंटले जात आहे. पॅनकार्ड आणि आधार कार्डची नोंदणी करून घर खरेदी करण्याचे आवाहन इच्छुकांना करण्यात आले आहे.

कमी किंमतीत मिळणार घरे (Mhada Mumbai)

म्हाडाच्या या योजनेमध्ये उपलब्ध असणाऱ्या 1BHK च्या घरांची किंमत 23,28,566 रुपये इतकी आहे. तर, 2BHK घरांची किंमत 41,81,834 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्वावर या घरांची विक्री केली जाणार असून, सोडत प्रक्रियेशिवाय त्यांचे वितरण (Mhada Mumbai) करण्यात येणार आहे.

दोन दिवसात मिळणार घराचा ताबा (Mhada Mumbai)

घराची रक्कम पूर्ण भरणाऱ्यांना अवघ्या दोन दिवसांत घराचा ताबा मिळणार असून, पॅन आणि आधार कार्डच्या आधारे पात्रता निश्चित करून ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान सदर योजनेसाठी इच्छुकांनी म्हाडाच्या (Mhada Mumbai) मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन इच्छुकांना करण्यात आले आहे.