Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची (Mhada Mumbai) उपलब्धता करून दिली जाते.
मुंबईत सुद्धा म्हाडा (Mhada Mumbai) कडून घरांची सोडत काढली जाते. मुंबईकरांची घर घेण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबईतील 1900 घरांसाठी जुलै महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्ट मध्ये त्याची सोडत निघणार आहे.
म्हाडा कडून पुणे, मुंबई सह राज्यातील अनेक शहरात घर उपलब्ध करून दिली जातात. स्वस्त दरात व मोक्याच्या ठिकाणी असलेली ही घरं सर्वसामान्यांना परवडतात. म्हाडाच्या (Mhada Mumbai) मुंबई मंडळाने ऑगस्ट 2023 मध्ये मुंबईतील जवळपास चार हजार घरांची लॉटरी काढली होती. यासाठी तब्बल सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते.
ऑगस्ट 2023 मध्ये म्हाडा गोरेगाव, विक्रोळी येथील घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यानंतर या वर्षासाठी म्हाडाची (Mhada Mumbai) लॉटरी कधी प्रसिद्ध होणार याची सर्वांना प्रतीक्षा होती मात्र अखेर आता प्रतीक्षा संपणार आहे माडाच्या मुंबई मंडळांना जवळपास 1900 घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाच्या घरांसाठी लोकेशनची मात्र माहिती आतापर्यंत समोर आलेली नाहीये.
मुंबईमध्ये गोरेगाव प्रेम नगर येथील तब्बल 322 हायफाय (Mhada Mumbai) घरांची उभारणी करण्यात आलेली आहे. ही घरं 800 ते 1000 स्क्वेअर फुटांची आहेत. ऑगस्टमध्ये निघणाऱ्या सोडतीमध्ये या घरांचाही समावेश करण्यात येणार आहे मात्र या घरांच्या किमती काय असतील हे अद्यापही जाहीर केलेलं नाही