MHADA Mumbai : MHADA तर्फे मुंबईत स्वस्तात गाळा खरेदी करण्याची संधी; 27 जूनला ई -लिलाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसारख्या चंदेरी दुनियेत घर खरेदी करणं जस सर्वसामान्य नागरिकाला परवडत नाही तसेच व्यव्यसायाला गाळा खरेदी करणंही काय सुखाचे नाही. म्हाडा (MHADA Mumbai) आणि सिडकोच्या माध्यमातून मुंबईकरांना स्वस्तात घरे खरेदी करता येतात, त्याचप्रमाणे आता मुंबईत जर तुम्ही गाळा खरेदी करणार असेल तर त्यासाठी म्हाडा पुढे सरसावली आहे. अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता म्हाडाच्या माध्यमातून ई लिलाव होणार आहे. येत्या २७ जूनला हा ई -लिलाव पार पडणार असून कमी पैशात गाळा खरेदी करण्याची हीच ती संधी आहे.

कोणत्या भागात किती गाळे – MHADA Mumbai

म्हाडाच्या मुंबई (MHADA Mumbai) गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (MHADA) अखत्यारीतील एकूण 173 अनिवासी गाळ्यांची विक्री केली जाणार आहे. यामध्ये न्यू हिंदी मील, माझगाव येथे २ , प्रतीक्षा नगर शिव 15, स्वदेशी मिल कुर्ला ५ , गव्हाणपाडा मुलुंड ८ , तुंगा पवई ३ , कोपरी – पवई ५ , मजासवाडी- जोगेश्वरी पूर्व १ , शास्त्रीनगर- गोरेगाव १ , बिंबिसार नगर – गोरेगाव पूर्व 17, चारकोप भूखंड क्रमांक एक 15, चारकोप भूखंड क्रमांक दोन 15, चारकोप भूखंड क्रमांक तीन ४ , जुने मागोठाणे बोरिवली पूर्व 12, महावीर नगर कांदिवली पश्चिम 12, मालवणी मालाड 57 असे गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे ?

27 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर 28 जून, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता https://mhada.gov.in व www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.