Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची (Mhada Mumbai) उपलब्धता करून दिली जाते.
म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये 2030 सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. म्हाडाच्या या घरांच्या किमती ह्या वाढलेल्या असल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी याला प्रतिसाद देणे टाळलं आणि त्यानंतर एक महत्त्वपूर्ण भूमिका घेत राज्य शासनाकडून घरांच्या किमतीमध्ये 10 ते 25 टक्क्यांनी घट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदतही 19 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एक पुढची अपडेट म्हणजे म्हाडाची लॉटरी नेमकी कधी काढली जाईल (Mhada Mumbai) असा प्रश्न विचारण्यात येतोय. आता याच घरांची लॉटरी जाहीर करण्यासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे चला जाणून घेऊया….
कधी निघणार लॉटरी ? (Mhada Mumbai)
मिळालेल्या माहितीनुसार मुदत वाढीनंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लॉटरी जाहीर करण्यात गेली असे समजते आहे म्हणजेच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये कोणाची निवड करण्यात आली आहे आणि कोणाची निवड केलेली नाही हे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात समजणार आहे.
घरांच्या किंमती कमी केल्या (Mhada Mumbai)
म्हाडाच्या घराच्या किंमती या 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विविध पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मध्ये देखील याचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार 33 (5) आणि 33 (७) अंतर्गत करण्यात आलेल्या योजनेतील घरं विकासकांकडून म्हाडाला मिळालेली आहेत. या घरांच्या किमती कमी होणार आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी किमती दहा टक्के कमी होणार आहेत तर मध्यम गटासाठी पंधरा टक्के रक्कम कमी होणाऱ आहेत तर अल्पगटासाठी 20% रक्कम कमी होणार आहे. शिवाय अत्यल्प गटासाठी असलेल्या घरांच्या (Mhada Mumbai) किमतीमध्ये 25 टक्क्यांनी घसरण होणार आहे.