म्हाडा बांधणार 12724 घरे; कोणत्या शहरांत किती घरे मिळणार? पहा सविस्तर आकडेवारी

mhada 12724 houses
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून शहरी भागात तर घर खरेदी करणं म्हणजे सर्वसामान्य माणसाला अशक्य आहे. नोकरीच्या जीवावर घरं घेणं खरं तर आवाक्याबाहेरच म्हणावं लागेल. त्यामुळे अशावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास (म्हाडा) कडून परवडणाऱ्या दरात मिळणाऱ्या घरांची वाट सर्वसामान्य माणूस अगदी आतुरतेने पहात असतो. त्याच पार्श्वभूमीवर येत्या आर्थिक वर्षात म्हाडा कडून या महानगरात तब्बल 12,724 घरे बांधली जाणार आहेत. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती येथे म्हाडाची ही घरे मिळणार आहेत.

म्हाडाने 2023-24 साठी 10,186 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यातील 5800.15 कोटी रुपयांची तरतूद घरे बांधकामासाठी केली जाणार आहे. या बजेटच्या माध्यमातून मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती येथे तब्बल 12,724 घरे बांधली जाणार आहेत. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात हजारो लोकांची घरांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत.

कोणत्या विभागात किती घरे बांधणार ?

म्हाडाकडून मुंबईत 2152 घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 3664.18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोकण मंडळांतर्गत 5614 घरे बांधली जातील. यासाठी 741.36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे विभागात 862 घरांचा निर्णय होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 540.70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मंडळांतर्गत 1417 घरे उपलब्ध होणार आहेत त्यासाठी 417.85 कोटींची तरतूद करण्यात आलीये , छत्रपती संभाजीनगर येथे 1497 घरे बांधली जातील. यासाठी 212.08 कोटी, नाशिक 749 फ्लॅट बांधले जाणार असून त्यासाठी 77.32 कोटी आणि अमरावती विभागात 413 घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी 146.24 कोटींची तरतुद केली आहे.