राज्यात मध्यावधी निवडणुका? शरद पवारांनी दिले संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार आपलं बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकीची शक्यता व्यक्त करत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर वर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित होत्या. त्यावेळी सध्याची राजकीय परिस्थिती आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा झाली. यावेळी पवारांनी मध्यावधी निवडणूकांचे संकेत दिले.

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार जास्तीत जास्त 6 महिने टिकेल. डिसेंबर पर्यंत राज्यात मध्यावधी निवडणूका लागतील. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या निवडणूका एकाच वेळी होतील अस शरद पवार म्हणाले. मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्याची तयारी असावी. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्यावे, असेही शरद पवार म्हणाले.

Leave a Comment