राजस्थान, भरतपूर । लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांमध्ये उपासमारीमुळे देशाच्या शहरी भागांतील लाखो मजुरांनी ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे. हातचा रोजगार गमावलेल्या स्थलांतरित मजुरांचे कळप शहरातून आपापल्या राज्यात जमेल त्या मार्गाने परत जाताना दिसत आहेत. वाहतुकीची साधन आणि खिशात पैसे नसल्यानं या मजुरांची पायपीट आणि त्यांच्यावर ओढावणाऱ्या दुर्दैवी प्रसंगांच्या अनेक करून कहाण्या सध्या ऐकायला मिळत आहेत. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात काम करणाऱ्या एका स्थलांतरित मजुराचा किस्साही असाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील राराह गावात राहणाऱ्या साहेब सिंह यांची सायकल सोमवारी रात्री चोरीला गेली. दुसऱ्या दिवशी घराच्या व्हरांड्यात त्यांना एक चिठ्ठी सापडली.
मोहम्मद इक्बाल या स्थलांतरित मजुराने या चिठ्ठीत मी तुमची सायकल चोरली आहे, अशी कबुली दिली. मोहम्मद इक्बालला उत्तर प्रदेशमधील बरेली येथे जायचे होते. त्यासाठी त्याने सायकल चोरल्याचे सांगितले. यासाठी त्याने सायकलच्या मालकाची माफीही मागितली आहे. मोहम्मद इक्बाल याने पत्रात म्हटले आहे की, मी मजूर आहे, मजबूर आहे. मी तुमचा गुन्हेगार आहे. तुमची सायकल घेऊन जात आहे. मला माफ करा. मला बरेलीपर्यंत जायचे आहे. माझ्याकडे कोणतेही साधन नाही आणि माझा मुलगा अपंग आहे, असे मोहम्मद याने पत्रात लिहले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटकरी दुःख व्यक्त करत आहेत.
हीच ती चिठ्ठी-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”