ब्रेकिंग ! मिलिंद एकबोटे यांच्यावर चाकूने हल्ला

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | भीमा कोरेगाव येथे घडलेल्या दंगली नंतर वादाच्या भोवऱ्यातसापडलेल्या मिलिंद एकबोटे यांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या सहकार्यावर देखील चाकूने वार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मिलिंद एकबोटे कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या ठिकाणी विवेक पंडित या इसमासोबत मिलिंद एकबोटे यांची शाब्दिक वादावादी झाली. एकबोटे यांनी फेसबुक वर गोरक्षणाच्या संदर्भात लिहलेल्या पोस्ट वरून हि भांडणे झाली.

विवेक पंडित यांच्या सोबत झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणात आपल्याला विवेकपंडित यांनी मारहाण केली तसेच आपल्या सहकार्यावर चाकूने वार केले असा दावा मिलिंद एकबोटे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे.