मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?? गुलाबरावांच्या विधानाने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे राईट हॅन्ड मिलिंद नार्वेकर हे सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. शिंदे गटातील आमदार आणि राजचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत थेट वक्तव्य केलं आहे. मिलिंद नार्वेकर हे सुद्धा शिंदे गटात येणार असं समजतंय असं विधान त्यांनी जळगाव येथिल एका कार्यक्रमात केलं आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, ज्या चंपासिंग थापाने आपलं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी घातलं तो थापाही उद्धव ठाकरेंना सोडून गेला. आम्ही 50 खोके घेतले असतील, तर थापाने पण 50 खोके घेतलेत का? असा सवाल त्यांनी केला. थापा आमच्याकडे आला आता मिलिंद नार्वेकर पण येत आहेत असं ऐकतोय मी असं गुलाबराव पाटलांनी म्हंटल. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे असून शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी करताना ज्या चौकडीवर टीका केली होती त्यात मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश होता. नार्वेकर शिंदे गटात येणार अशा चर्चा यापूर्वीही रंगल्या होत्या. गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. पण दरवर्षी प्रमाणे गणेशाचं दर्शन घेतल्याचं स्पष्टीकरण शिंदेनी दिलं होतं.