उस्मानाबाद प्रतिनिधी। उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाशी तालुक्यातील तेरखेडा बावी गावात एक आश्यर्यजनक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याच्या घरी असलेला बोकड चक्क दूध देतोय. ही गोष्ट जर आपल्याला सांगितली तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र हा बोकड खरंच दूध देतोय. हे आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हे पाहिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरु आहे.
धनंजय जगताप या शेतकऱ्याचा हा बोकड आहे. वाशी तालुक्यातील बावी येथे जगताप हे शेती करतात. शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असावा म्हणून ते आपल्या संसाराचा गाडा हकण्यासाठी शेळी पालणाचा व्यवसाय ही करतात. त्यांच्याकडे अनेक शेळ्या, बोकड आहेत. मात्र त्यातला धर्मेंद्र नावाचा एक बोकड हा दूध देतोय. गेल्या चार दिवसापुर्वी धर्मेंद्र नावाचं बोकड दुध देत असल्याचे त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले आणि बघता बघता ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.
हे दुध देणार बोकड पाहण्यासाठी परीसरातील अनेक नागरिक गर्दी करत आहेत. आपले बोकड दूध देऊ लागल्यामुळे आपल्याला ही सुरवातीला धक्काच बसला पण दूध जर काढले नाही तर ते मनाने बाहेर पडते एवढेच नाही तर त्याला शेळीचे पिले ही पित असल्याचे जगताप यांनी सांगितलं.