हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Milk Price : जर आपल्याला फुल क्रीम दूध 46 रुपये प्रति लिटर आणि टोन्ड दूध फक्त 38 रुपये प्रति लिटर किंमतीने मिळू लागले तर ???होय भारतात असे एक शहर आहे जिथे याच दराने दूध मिळते. या शहराचे नाव आहे बेंगळुरू. मात्र आता प्रश्न असा पडतो की, देशाच्या विविध भागांत फुल क्रीम दुधाची किंमत 60 रुपयांपेक्षा जास्त असताना तिथे दूध इतके स्वस्त कसे काय ???
हे जाणून घ्या कि, अमूल कंपनीच्या फुल क्रीम दुधाची किंमत (Milk Price) अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये 62 रुपये प्रति लिटर, तर टोन्ड दुधाची किंमत अहमदाबादमध्ये 50 रुपये प्रति लिटर आणि दिल्ली एनसीआर, मुंबई आणि कोलकाता येथे 52 रुपये प्रति लिटर आहे. तसेच डबल टोन्ड दुधाचा दरही प्रतिलिटर 46 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये, स्थानिक डेअरी सहकारी टोन्ड दूध 40 रुपये तर फुल क्रीम दूध 48 रुपये प्रति लिटर दराने (Milk Price) विकले जात आहे. हैदराबादमध्ये, विजया नावाने दूध पुरवणारी स्थानिक डेअरी सहकारी संस्था टोन्ड दूध 48 रुपये आणि फुल क्रीम दूध 66 रुपयांमध्ये देत आहे.
राज्य सरकारची इंसेंटिव्ह योजना
देशाच्या इतर भागांच्या तुलनेत बेंगळुरूमध्ये सुमारे 16 रुपये प्रतिलिटर कमी दराने दूध (Milk Price) विकले जाते. इथे हे लक्षात घ्या कि, कर्नाटक राज्य सरकारच्या एका योजनेमुळे तिथे इतकी कमी किंमत आहे. 2008 मध्ये, तेथील राज्य सरकार कडून कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महासंघ किंवा KMF शी संबंधित दूध उत्पादकांना प्रति लिटर 2 रुपये इंसेंटिव्ह देण्यास सुरुवात झाली. नंतर 2013 मध्ये राज्य सरकारने ती वाढवून 5 रुपये प्रति लिटर केली. त्यानंतर पुढचे सरकार आल्यावर ते सहा रुपये प्रतिलिटर केले गेले.
हे इंसेंटिव्ह मिळावे म्हणून तेथील दुधाचे उत्पादन वाढले. तसेच KMF कडूनही दूधाची खरेदी अनेक पटींनी वाढली. काही काळानंतर परिस्थिती अशी बनली की पुरवठा वाढला आणि मागणी मर्यादित झाली. जास्त पुरवठ्यामुळे दुधाचे भाव एकतर स्थिर राहिले किंवा किंचित वाढले. इतके दूध खरेदी करून KMF ही देशातील दुसरी सर्वात मोठी डेअरी बनली. Milk Price
स्थानिक पातळीवर पुरवठा जास्त आणि मागणी कमी असल्याने, KMF कडे इतर काही दुग्धशाळा जितके पैसे कमवत आहेत तितके पैसे नाहीत. अशा प्रकारे हे फेडरेशन आपले जाळे पसरवण्यासाठी पायाभूत सुविधाही विकसित करू शकलेले नाहीत. म्हणून, 2021-22 मध्ये KMF ने दररोज सुमारे 82 लाख किलो दूध खरेदी (Milk Price) केले, तर त्याची दैनंदिन विक्री 50 लाख लिटरपेक्षा कमी होती. हे जाणून घ्या की,”KMF नंदिनी या ब्रँड नावाने दूध विकते.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kmfnandini.coop/sites/default/files/863_Revised%20Price.pdf
हे पण वाचा :
Railway कडून आज 142 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे लिस्ट पहा
Aadhar Card द्वारे सरकार देणार 5 लाखांपर्यंतचे कर्ज !!! मेसेज मागील सत्य जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवे दर तपासा
Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV
PNB Housing Finance कडून FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा