हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्याने होतात भरपूर फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आरोग्यासाठी सकस अन्न खाणे केव्हाही चांगले. मग ऋतू कोणताही असो. चांगले पौष्टिक अन्न आरोग्याला फिट ठेवण्यासाठी महत्वाचे ठरते. त्यात आता हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे हिवाळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी.  ग्रामीण भागात हिवाळ्यात बाजरीची भाकरी जास्त खाल्ली जाते. पण तुम्हाला या बाजरीच्या भाकरीचे फायदे माहित आहेत का? नसेल माहिती तर जाणून घेऊयात.

काय आहेत फायदे?

1) मधुमेहसाठी आहे उपयुक्त –

बाजरीची भाकरी खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवले जाते. बाजरीमुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि मधुमेहासारख्या आजारापासून दूर राहता येते. बाजरी हे फायबर युक्त आहे. तसेच बाजरी मॅग्नेशियमचा एक समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे ही बाजरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

2) हृदयासाठीही असते फायदेशीर

आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बाजरी हा एक उत्तम पर्याय आहे. बाजरीमध्ये अनेक पोषक तत्व आहेत. जे तुमच्याशी आरोग्याला फायदेशीर ठरू शकतात. बाजरी ही हृदयाच्या कार्यासाठी तसेच त्याचे आरोग्य राखण्यासाठी महत्वाची ठरते. बाजरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे अधिक आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा चांगला होतो. बाजरी खाल्ल्याने शरीरातील रक्त प्रवाह हा चांगल्या रीतीने होतो. रक्त प्रवाह चांगला झाला की हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

3) वजन कमी करण्यासही ठरते फायदेशीर

बाजरीचा रोज आहारात उपयोग केल्यास तुमचे वजन अधिक असेल तर ते कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आजच बाजरीचे प्रमाण आपल्या आहारात वाढवा. बाजरी ही पिठाच्या स्वरूपात अधिक जास्त वापरली जाते. त्यामध्ये बाजरीची भाकरी मोठ्याप्रमाणात खाल्ली जाते.