देशातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये पेन्शन! आपणही मोफत घेऊ शकता हा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी सर्व जगाला अन्न पुरवतो. पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आता केंद्रशासनाने देशातील या शेतकऱ्यांचे म्हातारपण सुरक्षित करण्यासाठी एक स्कीम आणली आहे. यामार्फत, देशातील 21 लाख शेतकऱ्यांनी आपले म्हातारपण सुरक्षित केले आहे. एवढ्या शेतकऱ्यांनी फार्मर पेन्शन स्कीममध्ये आपले नाव नोंदवले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांना या पेन्शनचा लाभ घेणे अजून सोपे आहे सरकार वार्षिक सहा हजार रुपये सन्मान निधीमध्ये देत असते. तो निधी आपण पेन्शन स्कीम मध्ये गुंतवल्यास याचा फायदा मिळू शकतो. पेन्शन स्कीममध्ये मिळालेला निधी आपोआप वळविण्याचा पर्यायही उपलब्ध उपलब्ध आहे.

या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम झारखंडमध्ये 12-9-2019 ला केली. 9 ऑगस्ट पासूनच रजिस्ट्रेशन सुरू झाले होते. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना असे आहे. 60 वर्ष वयानंतर शेतकऱ्यांना तीन हजार रुपये महिन्यासाठी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमार्फत शेतकरी आपले म्हातारपनीचे आयुष्य सुरक्षित करू शकतो आणि यामुळे त्याला कोणावरती अवलंबून राहावे लागणार नाही.

हरियाणा हे राज्य प्रधान मंत्री किसान मानधन योजना घेणारे सर्वात मोठे लाभार्थी राज्य आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास हे राज्य इतर राज्यांपेक्षा छोटे आहे. या राज्यांमध्ये जवळपास सव्वा चार लाख शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. पेन्शन योजनेचे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कॉमन सर्विस सेंटरवरती रजिस्ट्रेशन करावे लागेल. आधार कार्डची प्रत देणे गरजेचे असेल. यानंतर शेतकऱ्याला पीएम किसान स्कीमचा लाभ मिळत नसल्याचे पत्र द्यावे लागेल. सोबतच दोन फोटो आणि पासबुकची झेरॉक्स प्रत देणे गरजेचे आहे. यानंतर शेतकऱ्यांचे पेन्शनसाठी युनिट नंबर आणि पेन्शन कार्ड बनवले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like