सांगली प्रतिनिधी । नागरिकत्व विधेयका विरोधात देशात रान उठले आहे. संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरत असून या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत. राज्यात सुद्धा याचे पडसाद उमटत असताना आता सांगलीमध्ये देखील याला विरोध होताना पहायला मिळत आहे. आज ‘एमआयएम’ तर्फे याचा विरोध करण्यात आला. ‘मुस्लिम समाजाविरोधी लागू होणारा राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा तातडीने रद्द करण्यात यावा’ अशी मागणी एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून करण्यात आली.
कायदा लागू केला तर जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा दिला इशारा यावेळी देण्यात आला. एमआयएम पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात ”देशातील भाजपा सरकार संविधानाला आणि विशीष्ट धर्माला टार्गेट करनारे आहे. नागरिकत्व दुरुस्ती या विधेयकामुळे भारतीय राज्यघटनेतील देशातील सर्व जाती धर्माला एकत्रित ठेवणार्या उद्देशाला या विधेयकामुळे ‘भाजपा’ने तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये भारतातील हिंदू – मस्लिम, बौद्ध, पारशी, शीख या समाजामध्ये तेढ निर्माण होणार आहे.”असे म्हणले आहे.
दरम्यान जिल्हा एमआयएम पक्षाच्यावतीने या जाचक बिलाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी विधेयक तातडीने रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे केली गेली आहे. जाचक विधेयक त्वरित भाजपा सरकारने रद्द करावे, अन्यथा जिल्हयामध्ये ‘एमआयएम’च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी दिला आहे.