हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अर्थात एमआयएमच्या नेत्यांकडून वादग्रस्त अशी वक्तव्ये केली जात आहेत. दरम्यान आज एमआयएम अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी वादग्रस्त असे वक्तव्य केले आहेत. सर्व धर्म आणि जातींना आपापला नेता आहे, मग तुम्ही तुमचा प्रतिनिधी कधी निवडणार? असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले जन्माला घालावी लागतील, असे नूर यांनी म्हंटले आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी हे सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या दरम्यान एमआयएम अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनि एका बैठकीत वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी ते म्हणाले की, ज्यामध्ये असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले जन्माला घालावी लागतील.
#WATCH अलीगढ़: बच्चे नहीं होंगे तो हम लोग कैसे राज करेंगे? कैसे ओवैसी साहब प्रधानमंत्री और शौकत साहब मुख्यमंत्री बनेंगे? दलितों, मुसलमानों को डराया जा रहा है कि बच्चे बंद करो। क्यों बंद करें बच्चे? यह शरीयत के ख़िलाफ़ है: AIMIM के अलीगढ़ ज़िले के अध्यक्ष गुफरान नूर pic.twitter.com/uxlyPRR0EO
— ANI_HindiNews (@AHindinews) December 16, 2021
“जर मुस्लिमांना जास्त मुलं होणार नाहीत, तर मग आपला समाज भारतावर राज्य कसा करणार? आपली संख्या जास्त नसेल तर असदुद्दीन ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होतील, शौकत अली साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कसे होतील,” असे ते म्हणताना दिसत आहेत. दलित, मुस्लिमांना मुलं जन्माला घालण्यापासून रोखण्यासाठी धमकावले जात आहे. आम्ही का मुलं जन्माला घालू नयेत? हे आमच्या शरियतच्या विरोधात आहे,” असंही ते म्हणाले.