औरंगाबाद – राज्य सरकारने घेतलेल्या स्टोरमध्ये वाईन विक्रीला विरोध केल्याने जिल्ह्यात शिवसेना आणि एमआयएम मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. अशातच रविवारी संध्याकाळी एमआयएम च्या वतीने शहरभर पंतप्रधान घरकुल आवाज योजनेची खिल्ली उडवणारे बॅनर लावण्यात आले आहे.या मुळे आता एमआयएम आणि भारतीय जनता पक्षा मध्ये येत्या काळात राजकीय युद्ध पाहायला मिळू शकते.
खा इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान घरकुल आवाज योजनेची जिल्ह्यातील स्थिती बाबत पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला होता. 80 हजार पेक्षा अधिक अर्ज आले असताना फक्त 355 लोकांनाच हा लाभ देण्यात आल्या बाबत नाराजी व्यक्त करीत लोकसभेत देखील हा मुद्दा उपस्थित केला होता.या बाबत आता एमआयएम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून औरंगाबाद शहरातील भडकल गेट,जिन्सी, सिटीचौक अशा विविध चौकात एमआयएम च्या वतीने पंतप्रधान घरकुल योजनेची खिल्ली उडवणारे बॅनर लावले आहे.
या बॅनर वर सपणो का घर सापनोमेही मिलेगा असे मजकूर लिहिलेले आहे तर घरकुल योजनेचा फेककुल योजना असा उल्लेख करण्यात आला आहे.एमआयएम च्या या बॅनरबाजी ने येत्या काळात भाजप आणि एमआयएम मध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकते.