देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आजकाल राज्यात अपघाताचे (accident) प्रमाण वाढले आहे. रोजी कुठे ना कुठे अपघात (accident) घडत आहेत. असाच एक अपघात नाशिकमध्ये घडली आहे. यामध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याचे समोर आले आहे. मिनी बस च्या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले आहे. त्यामध्ये 29 प्रवासी होते. या अपघातातील (accident) जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
भाविक त्र्यंबकेश्वर येथील दर्शन आटपून ते ब्रम्हगिरी पर्वतावर गेले होते तेथूनही परतत असतांना गंगाद्वारे जाणाऱ्या उताऱ्यावर हि मिनी बस उलटून अपघात (accident) झाला. नाशिकच्या ग्रामीण हद्दीत ही घटना घडली आहे. या बसमधील सर्व भाविक बुलढाणा येथून नाशिकला दर्शनासाठी आले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. दर्शनासाठी आलेले सर्व भाविक हे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असून ते त्र्यंबकेश्वर येथे आज दुपारच्या वेळी देवदर्शनासाठी आले होते. या अपघाताची (accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपासाला सुरुवात केली.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?