हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारच्या सुरुवातीपासून शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्त्ववादी शिवसेना आता सेक्युलर झाली आहे असा आरोप भाजप करत आहे. याच दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं असल्याची भूमिका शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली.
आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळं आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझं हिंदुत्व आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपाचं हिंदुत्व राजकीय हिंदुत्व आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर ते आपल्या हिंदुत्वाला योग्य मानतात तर पीडीपी सोबत कसे गेले? आम्ही त्यांच्या सोबत होतो. परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचं हिंदुत्व? त्यांचं एका राज्यात वेगळं हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळं हिंदुत्व असतं. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडी चांगलं काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण पाच वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’