मी जन्माने आणि कर्माने हिंदू – उर्मिला मातोंडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. हातात भगवा घेतल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश घेतला.

शिवसेनेने तुमच्यावर कोणती नवी जबाबदारी टाकली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. माझ्या इथून पुढच्या राजकीय कारकीर्दीत मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीन, लोकनेता होण्याचा प्रयत्न करीन”.

सेक्युलर याचा अर्थ धर्मांचा तिरस्कार करणे नाही, मी जन्माने आणि कर्माने हिंदू, हिंदू धर्माचा अभ्यास, नवव्या वर्षापासून योग करते, देव मंदिराच्या गाभाऱ्यात असतो, तसा धर्म हा मनातील आस्थेचा विषय आहे असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हंटल आहे. माझे ट्रोलर्स हीन पातळीवर वैयक्तिक टीका करतात, मी मराठी आहे, पाऊल पुढेच टाकणार, त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं करेन असंही त्या म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like