हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमय्यांनी जे काही आरोप केले आहे. त्या आरोपांचं पुरव्यासह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा 72 तासात माफी मागावी नाहीतर किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, अशी नोटीसच अनिल परब यांच्या वकिलांनी सोमय्या यांना पाठवली आहे.
अनिल परब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नते आणि मंत्री आहेत. मेहनत करून त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या निराधार आरोपांमुळे प्रतिमा डागाळत असल्याचा उल्लेख नोटीशीत करण्यात आला आहे. तसेच नोटीशीत काही ट्वीटचा तारखेसह उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या यांनी सर्व ट्विट डिलीट करून माफी मागावी अन्यथा आपण 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचे अनिल परब यांनी नोटीसीत म्हंटल आहे.




