सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांनी घेतली पवारांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील सोमय्यांनी आरोप केले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजत आहे.

मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. सोमय्यांचे आरोप आणि सत्य परिस्थिती यासंदर्भातली माहिती पवारांनी मुश्रीफांकडून घेतल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा मागे लागला आहे, त्याबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे.

100 कोटींचा दावा ठोकणार-

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबतचे 2700 पानांचे पुरावे सोमय्या यांनी आज मुंबईत आयकर विभागाला दिले आहेत. दरम्यान, सोमय्या यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा आपण त्यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

You might also like