हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेत्याकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. दरम्यान आज धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केला. आजही ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय. कारण देशात अजूनही मनुवादी प्रवृत्ती जिवंत आहे. त्यामुळे त्रास हा होणारच आहे. त्यामुळे घाबरून चालणार नाही, न घाबरता पुढे जायचे, असे भुजबळ म्हणाले.
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, “आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्रास देण्याचे काम केले जात आहे. यापुढेही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ओबीसी सामाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत सांगायचे झाले तर सध्याचा काळ हा ओबीसींच्या संक्रमणाचा, परीक्षा घेणारा काळ आहे. मात्र आपल्याला त्यावर मात करत पुढे जावे लागणार आहे. सामाजिक न्यायासाठी संघटनेची आवश्यकता होती. त्या आधारावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करण्यात आली.
“प्रगत शेती आणि शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची कल्पना त्यांनी त्या काळात मांडली. जाती व्यवस्था नष्ट करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. महात्मा फुले यांनी शिक्षण द्या आणि कामं वाटून घ्या जातीच्या प्रमाणे असे सांगितले हेच आरक्षण आहे.”असे आरक्षणाबाबत मंत्री भुजबळ म्हणाले.