… तोपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही; पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर एकनाथ शिंदेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद कोल्हापूर व बेळगावात उमटले आहेत. दरम्यान या घटनेवरून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मंत्री यांनी दिला आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत म्हंटले आहे की, कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचे स्तोम थांबवावे, अशी मागणी मंत्री शिंदे यांनी केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालयानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा असून त्याची गुरूवारी रात्री विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे. त्या घटनेचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले.

Leave a Comment