Wednesday, June 7, 2023

देशातील ‘या’ महामार्गावर महाराष्ट्रातील नेत्याचे हेलिकॉप्टर झाले लँड; विमान सुद्धा घेणार ‘टेक ऑफ’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महामार्गावर हॅलिकॉप्टर लँड होतानाचे दृश्ये आपण दाक्षिणात्य चित्रपटात तसेच हिंदी चित्रपटात पाहतो. मात्र, असेच दृश्य आता वास्तव स्वरूपात पाहता येणार आहे. कारण केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अशाच एका देशातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग साकारण्यात आलेला आहे. तो म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग होय.

या महामार्ग एका विशिष्ट अशा पद्धतीने तयार करण्यात आलेला असून या महामार्गावर नुकतेच नगरविकास मंत्री एकनाथ शिदे यांच्या हेलिकॉप्टरने लँड केले. दरम्यान या महामार्गावरून विमान सुद्धा उडविले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील सर्वात लांब अशा स्वरुपाच्या असलेल्या या समृध्दी महामार्गाचे 2 मे रोजी उदघाटन केले जाणार आहे. मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701किमी लांबीचा आहे. 8 पदरी स्वरूपाच्या असलेल्या हा महामार्ग 2 हजार 120 मीटर रुंदीचा नियोजित असा महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडणार आहे.

दरम्यान, आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची हेलिकॉप्टरने पाहणी केली. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरविण्यात आले. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे 2 मे रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार असा 210 किलोमीटरचा मार्ग पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उदघाटन

आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी प्रथमच त्यांचे हेलिकॉप्टर महामार्गावर लँड करण्यात आले. यावेळी त्यांनी येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी अशा समृद्धी महामार्गाचे उदघाटन केले जाणार अशी माहिती दिली.