Sunday, June 4, 2023

वीज वितरणला दिवसा दिसेना : कराडात रात्रं-दिवस रस्त्यावर लाईट सुरू, लोकांच्यात संताप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यात लोडशेडीग सुरू होणार असून कडाक्याच्या उन्हाळ्यात वीज जपून वापरावी असा संदेश वीजवितरण कंपनीकडून दिला जात आहे. मात्र, कराड शहरातील अनेक रस्त्यावरील विद्युत खाबांवरील लाईट गेल्या दोन दिवसापासून बंद केल्या जात नाहीत. दिवसाढवळ्या रस्त्यावरील लाईट चालूच ठेवल्या जात असल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

कराड शहरातील मंगळवार पेठेत गेल्या दोन दिवसापासून रस्त्यावरील लाईट ही दिवस- रात्र सुरूच ठेवली जात आहे. याबाबत संबधितांना काही नागरिकांनी विचारणाही केली, मात्र त्यानंतरही विजवितरण झोपेत असल्याचे दिसून येत आहे. विज वितरण कंपनीच्या या भोगळ कारभारामुळे वीज वाया जात नाही का असा सवाल नागरिकांच्यातून केला जावू लागला आहे.

सध्या वीजेच्या कमतेरतेमुळे अनेक ठिकाणी लोडशेडीग करण्यात येणार आहे. त्यासाठी वीज वितरणकडून वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. तसेच लोकांनी वीजेची बचत करावी, यासाठी लोकांच्या जनजागृतीही केली जात आहे. मात्र स्वतः रस्त्यावरील लाईट दिवसाही सुरू ठेवल्या जात आहेत. त्याकडे कधी लक्ष देणार