मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वीज ग्राहकांना आवस्तव बिलं आल्याने नागरिकांमधून एकच संताप व्यक्त होत आहे. काही पक्षांकडून आणि संघटना यांच्याकडून वाढीव विजाबीलाविरोधात आक्रमक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. याच बाबीवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. यावेळी वाढीव वीजबिल बाबत त्यांनी ग्रहकांना सल्ला देखील दिला आहे.
*ऑनलाईन व मोबाईल अँप द्वारे देता येणार तक्रार*
बैठकीदरम्यान डॉक्टर राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशील करण्याचे महावितरण व्यवस्थापनाला निर्देश दिले आहेत. ग्राहकांना मोबाईल ॲप वर ऑनलाईन तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत याशिवाय जवळच्या. कार्यालयात जाऊन देखील ऑफलाईन तक्रार देण्याची सोय करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत.
तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अचूक विज बिल देण्यासाठी ग्राहकांनी काय करावे याचा देखील सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, करोना काळात रिडींग न घेता बिले पाठवल्या प्रकरणी ग्राहकांनी तक्रार केली आहे. म्हणूनच शक्यतो रिडींग घेऊनच विज बिल पाठवले गेले पाहिजे. कोरोनामुळे महावितरणला रीडिंग घेण्यासाठी जाणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रीडिंग पाठविले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असं मत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलं आहे.