सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाज का सुटली? तानाजी सावंताचे धक्कादायक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान मराठा आरक्षणाबाबत (reservation) धक्कादायक वक्तव्य केले आहे. दोन वर्ष मराठा आरक्षण (reservation) गेल्यामुळे गप्प होते, आता सत्तांतर झाल्यावर लगेच मराठा आरक्षणाची (reservation) खाज सुटली, मिळालीच पाहिजे’ असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी भरसभेत केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये शिंदे गटाचा हिंदु गर्व गर्जना मेळावा पार पडला यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

https://www.facebook.com/100007276878866/videos/3354667904857527/

काय म्हणाले तानाजी सावंत?
‘ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजासाठी मी आहेच, मग बाकीच्या जातींचा द्वेष करा असं थोडी आहे. यांचे डोक बघा कसं चालतंय. कधी ओबीसीतून आरक्षण द्या, आम्हाली एससी समाजातून आरक्षण (reservation) मागितले जात आहे. नेमकं यामागे डोक कुणाचं आहे, हे लोकांना लक्षात आले पाहिजे. दोन महिन्यांपूर्वीच सत्तांतर झाले आणि लगेच आरक्षणाची (reservation) खाज सुटली, असे वक्तव्य त्यांनी भरसभेत केले.

6 महिन्यात मराठा आरक्षण गेलं
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मुक मोर्चे काढण्यात आले. त्यांचा अपमान करण्यात आला. आम्ही गप्प बसलो. ब्राह्मण म्हणून टीका करण्यात आली. तरीदेखील आम्ही गप्प बसलो. पण, याच ब्राह्मणाने 2017-18 ला याच मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण (reservation) दिलं. दोन तीन बॅच बाहेर आल्या. यानंतर 2019 ला लोकांचा विश्वासघात करून ही लोक सत्तेवर आली आणि 6 महिन्यात मराठा आरक्षण गेले अशी टीका तानाजी सावंत यांनी यावेळी केली.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर