राज्यमंत्री बच्चू कडू यांनी धरला पंजाबी ढोलवर ठेका

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांचा भांगडा नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या राज्यात एक डॅशिंग आमदार म्हणून ओळख असलेले राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांचे एक वेगळेच रूप लोकांना पाहायला मिळाले.

बच्चू कडू (bachchu kadu) आज अकोल्यात एका लग्न समारंभासाठी आले असताना या लग्नात खास पंजाबवरून भांगडा पथक आले होते. यावेळी पंजाबच्या या भांगडा पथकाकडून राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांच्या सन्मानार्थ पंजाबी ढोल वाजविण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री बच्चू कडूंना (bachchu kadu) भांगड्यावर थिरकायचा मोह आवरला नाही. अन त्यांनी यावेळी फेर धरत भांगडा नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला. याआधी पालकमंत्र्यांनी एका अनाथ मुलीचे कन्यादान करून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलकांची मुंबई मेलवर दगडफेक

मी ईडीच्या चौकशीला तयार, तुमच्यात दम आहे का?

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Post Office च्या खातेदारांसाठी ‘हा’ नंबर आहे खूप महत्वाचा !!!

सदाभाऊ खोटारडा माणूस, माझा अन् राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही; हॉटेल मालकाचे प्रत्युत्तर