व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मी ईडीच्या चौकशीला तयार, तुमच्यात दम आहे का? : खा. उदयनराजे यांचा अजित पवारांना सवाल

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

मी ईडीच्या चौकशीला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार राहा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की लोकलुटारे आहेत हे ठरवावे, असा घणाघाती टीका खासदर उदयनराजें यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माण तालुक्यातील एका कार्यक्रमात खासदार उदयनराजेंवर खंडणीखोर म्हणत अप्रत्यक्षपणे टीका केली होती. याला खासदार उदयनराजे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

खा‌. उदयनराजे भोसले म्हणाले, तुम्ही त्या काळी साताऱ्याचे लोकप्रतिनिधी होता, मंत्री होता. त्यावेळी तुमची जबाबदारी का नाही पार पाडली? ज्या कंपन्या साताऱ्यातून गेल्या त्यांना जाऊन विचारा मला कशाला विचारता. या कंपन्या साताऱ्यातून जाण्याला कारणीभूत कोण आहे? असे असताना माझ्यावरच खंडणी मागतात असा उलट आरोप केला जात आहे. मी पक्षाला घरचा आहेर दिला, असे बोलले जाते. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावे. माझ्यात दम आहे, मी ईडीच्या चौकशीला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार राहा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की लोकलुटारे आहात, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.