हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “पंतप्रधान मोदींनी घेतलेला हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा विजय आहे. आता फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. अनेक धोरणं बदलावी लागतील,, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो होतो. आता फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. अनेक धोरणं बदलावी लागतील. त्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. सरकारने नवीन धोरण तयार करायला हवे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, हा शेतकऱ्यांचा विजय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो असं सांगत मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, अनेक नेत्यांनी उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकांमध्ये पराभव होण्याच्या भीतीनेच मोदींनी हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.