कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई हे उत्तम संसद पट्टूसह एक सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवणारे नेते आहेत. त्यांचा बिंधास्तपणाही अनेकदा पहायला मिळतो. त्यांचा मरळी येथील निनाई देवीच्या यात्रेत पालखी समोरील सुपुत्रासोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी गुलालाची उधळण करत डान्स केला आहे.
पाटण तालुक्यातील मरळी गावच्या निनाईदेवीची यात्रा उत्साहात पार पडली. यावेळी गावच्या यात्रेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकुटूंब उपस्थिती लावली. यावेळी गावातील त्यांच्या घरासमोर पालखी येताच शंभुराज देसाईंनी सहकुटुंब ग्रामदेवता निनाईदेवीचे दर्शन घेतले. तसेच गुलालाची उधळण केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत पालखीसमोर जाऊन मंत्री देसाई यांनी गाण्यावर ठेका धरला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र तथा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनीही गुलालाची उधळण करत ठेका धरला.
Satara News : मंत्री शंभूराज देसाईंनी सुपुत्रासोबत धरला देवीच्या यात्रेत ठेका pic.twitter.com/hyXDULIii2
— santosh gurav (@santosh29590931) March 28, 2023
मंत्री देसाई यांच्या घरासमोर पालखी येताच ग्रामस्थांनीही मंत्री देसाई यांना उचलून डोक्यावर घेतले. तसेच त्यांच्यासोबत गाण्यावर ठेका धरला. यावेळी ग्रामस्थ तसेच गावातील तरुणांनाही मंत्री देसाई यांच्यासोबत डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.