Amazon Prime मेंबरशिपवर मिळवा 50% सूट, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील लोकांमध्ये Amazon Prime खूपच लोकप्रिय झाले आहे. कारण याच्या मेंबरशिपमुळे व्हिडीओ आणि म्युझिक व्यतिरिक्त, अर्ली डीलचा एक्सेस आणि फास्ट डिलिव्हरी सारखे अनेक फायदे देखील मिळतात. यासाठी 1,499 रुपये एनुअल सब्सक्रिप्शन फी द्यावी लागते. मात्र, आता एका ऑफर अंतर्गत आपल्याला यावर 50 टक्के सूट मिळू शकेल.

Amazon Prime Video में हुआ बड़ा बदलाव, मिलेगा बहुत कुछ नया, जानिए सभी  फीचर्स की डिटेल - Amazon Prime Video Redesign New Navigation Menu and More  Features Added ttec - AajTak

Amazon Prime मेंबरशिप मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक या प्रकारच्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. यामधील मासिक प्लॅनची ​​किंमत 179 रुपये, तीन महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत 459 रुपये तर वार्षिक सबस्क्रिप्शनची किंमत रुपये 1,499 आहे. मात्र, Amazon प्राइम युथ ऑफरद्वारे याचा वार्षिक प्लॅन फक्त 749 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकेल. तसेच, इतर योजनांवरही सूट मिळू शकेल.

मात्र, हा वार्षिक प्लॅन 50 टक्के सवलतीमध्ये खरेदी करण्यासाठी, आपले वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासोबतच युझर्सना 179 रुपयांच्या प्लॅनवर 90 रुपयांचा कॅशबॅक तर 459 रुपयांच्या प्लॅनवर 230 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. Amazon Prime

Llegan los canales de pago a Prime Video: precios, temática y  disponibilidad | Smart TV | Cinco Días

अशा प्रकारे या कॅशबॅकनंतर या मासिक प्लॅनची ​​किंमत 89 रुपये तर 3 महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत 229 रुपये होईल. Amazon Prime मेंबरशिपसाठी ही सर्वात कमी किंमत असेल.

तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, Amazon Prime वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर आपल्या सध्याच्या खात्याने लॉग इन करावे लागेल. जर आपल्याकडे खाते नसेल तर नवीन खाते देखील तयार करता येईल.

यानंतर फ्री ट्रायलसाठी कोणताही एक पालन निवडता येईल. त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सारखे डॉक्युमेंट द्यावे करावे लागतील आणि सेल्फी देखील क्लिक करावी लागेल. तसेच या व्हेरिफिकेशननंतर कॅशबॅक मिळेल. तसेच, ही ऑफर प्राइममध्ये सामील झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत लागू होईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.primevideo.com/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर