कोणतही विना परवाना कृत्य सहन केलं जाणार नाही; उदयनराजेंच्या चित्रावर शंभूराज देसाईंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे भिंतीवर चित्र काढण्यावरुन उदयनराजे यांचे कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये चांगलाच वाद झाला. या प्रकरणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणतही विना परवाना कृत्य साताऱ्यात सहन केलं जाणार नाही. वेळप्रसंगी कायद्याचा वापर करावा लागला तरी चालेल,” असा इशारा मंत्री देसाई यांनी दिला आहे.

सातारा येथे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सकाळी पोवई नाक्यावरील ‘कोयना दौलत’ या निवासस्थानानजीक इमारतीवरील भिंतीवर खा. उदयनराजे भोसले यांचे चित्र काढण्यावरून पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीवर प्रतिक्रिया दिली. मंत्री देसाई म्हणाले की, सातारा जिल्ह्यात कोणत्याही स्वरूपाचे विनापरवाना कृत्य केले जाणार नाही. जे कोणी कृत्य करत असतील तर त्यांना पॊलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. वेळ प्रसंगी कायद्याचा अंमल त्या ठिकाणी केला जाईल, असा इशारा मंत्री देसाई यांनी दिला.

दरम्यान आज सकाळी उदयनराजे भोसले यांच्या पेंटींगवरून त्यांचे कार्यकर्ते वपोलिसांच्यात झालेल्या वादावादीमध्ये पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेवरून खा. उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मंत्री शंभूराज देसाई यांनी कायद्यांचे पालन न केल्यासक थेट कारवाईला समोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.