नुसता शो नको, आय वॉन्ट ऍक्शन – गृहराज्यमंत्र्यांकडून वाहतूक पोलिसांची कानउघडणी

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवजड वाहन चालकांच्या मनमानी कारभारामुळे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई चांगलेच संतापले आहेत. नुसता शो नको तर आय वॉन्ट ऍक्शन , कडक कारवाई करा अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कडक कारवाई करा असेही ते म्हणाले.

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची गय करू नका त्यांच्यावर कडक कारवाई करा असा आदेश त्यांनी दिला.यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, हायवे ट्राफिक वरती जे अपघाताचे प्रमाण वाढत आहे किंवा अपघात होणाऱ्या संख्येत वाढ होत आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी वाहतुकीला शिस्त लागावी यांच्याकरिता 14 तारखेला सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई मध्ये बैठक घेतली होती.

जे काही सर्वसामान्य वाहन चालक आहेत जे सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपलं वाहन चालवतात अशा लोकांना आशा बेजबाबदार लोकांमुळे त्रास होतो. शेवटी वाहनातुन प्रवास करणाऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here