कंगणाला महाराष्ट्र पोलिसांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही; गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी कंगणाला फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कंगणा राणावतच्या ट्विटला किती महत्व द्यायचे हा संगळ्यानीच विचार करण्यासारखा विषय आहे. ज्याच्या महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, महाराष्ट्रात राहयचं, करियर करायचं, काम करायचं, महाराष्ट्रातील लोकांच्या जीवावर मोठ व्हायचं आणि इथल्या पोलिसांवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. माझ्यावरील खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवा असे म्हणायचे अशा कंगणा राणावतला महाराष्ट्र पोलिसांवर व सरकारवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकार पडेल असे कंगना राणावत हिच्या ट्विट बद्दल पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, या प्रकरणात पोलिसांचे नांव कुठेही मलिन झालेले नाही. जगभरात त्यांचे नांव असून त्यांची तुलना स्कॉटलंट पोलिसांशी केली जात आहे. महाराष्ट्र पोलिस आपल्या पध्दतीने तपास करत असताना त्यांच्यावर अविश्वास दाखणे गैरविश्वास दाखवून तपास इतरत्र देणे योग्य नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment