मंत्री शंकरराव गडाखांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे आज हातात शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.शंकरराव गडाख हे नेवासा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

आज शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. याआधी नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. सेना सतेत असो वा नसो मी तुमच्याबरोबर राहील असा ठाम शब्द गडाखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अखेर गडाख यांनी सेनेत प्रवेश केला.

नगर जिल्ह्यातील गडाख कुटुंब हे राजकारणातील मात्तबर नेते आहेत. गडाख यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. माझ्या शिवसेना प्रवेशामुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असलेल्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे तसेच विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेल असे, असं गडाख यांनी यावेळी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here