हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रभर राजकारण चांगलंच तापलं आहे.मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले असून मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शाहू राजांची गादी चालवणारे खासदार संभाजीराजे यांची एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा चुकीची आहे, असंही विजय वड्डेटीवार म्हणाले.
विजय वड्डेटीवार यांनी सांगितलं की, बहुजन लोकांसाठी आरक्षण देणाऱ्या राजाचे वारसदार वेगळी भाषा बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत इतर बलुतेदार होते. विरोध करणारे मोरे, जावळे होते, हा इतिहास आहे. राजाची भूमिका जनतेची हवी, केवळ एका समाजासाठी तलवार काढणे भाष्य योग्य नाही, अशा शब्दांत विजय वड्डेटीवार यांनी संभाजीराजेंना टोला लगावला.
‘एमपीएससी परीक्षेत 200 जागा आहेत. त्यात 23 जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे नुकसान व्हावं अस नाही. म्हणून राजांना सांगतो मध्य मार्ग काढता येतो. हे राजकारण कशाला? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये, असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
संभाजीराजे असो वा प्रकाश आंबेडकर समाजात तेढ निर्माण होईल, असं वक्तव करत आहे. त्याचा राजकीय फायदा कोणास व्हावा हा उद्देश आहे. हे राज्यातील जनतेला चांगल्याप्रकारे समजते , राजकीय पक्षाची झूल घालून कोण काय विधान करते, हे समजतं, अशी टीका देखील वड्डेटीवार यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’