“हॅलो महाराष्ट्रच्या” बातमीनंतर अवघ्या काही तासांतच वीज कनेक्शन जोडण्याच्या मंत्र्याच्या सूचना

आयटीआय काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील विद्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जवळपास बारा लाख रुपये लाईट बिल थकल्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. काल (दि.१ एप्रिल) हॅलो महाराष्ट्रने वित्तमंत्री यांच्या कराडच्या आयटीआय काॅलेजचे १२ लाख वीज बिल थकित असल्याने विद्यार्थी अंधारात अशी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर काही तासातच वीज कनेक्शन जोडण्यात आले आहे. उद्योजकता काैशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि गृहराज्यमंत्री व वित्तमंत्री, काैशल्य विकास मंत्री शंभूराज देसाई यांनी काही तासांतच वीज जोडण्याविषयी सूचना दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबले आहे.

गुरूवारी दुपारी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी आयटीआय काॅलेजचे प्रभारी प्राचार्य सुभाष भोसले यांची भेट घेतली होती. तसेच वीज बिल सात दिवसांत न भरल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच विद्यार्थ्यांनीही होणारे शैक्षणिक नुकसान यांची कैफियत हॅलो महाराष्ट्र टीमजवळ मांडली होती.

त्यानंतर हॅलो महाराष्ट्राने सदरचा विषय मांडला होता. तेव्हा बातमीची दखल घेत अवघ्या काही तासांतच कराड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तोडण्यात आलेले वीज कनेक्शन जोडण्यात आली आहे. त्यामुळे दीड हजार विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले आहे.

You might also like