धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीसोबत वाहकाने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

ratnagiri rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत बसच्या वाहकाने विकृत कृत्य केले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने आरोपी बस वाहकाविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी वाहकाला अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

प्रशांत किसन गोडवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुणे शहराच्या कात्रज परिसरातील रहिवासी असून तो पीएमपीएलमध्ये बस वाहक म्हणून काम करतो. हि पीडित मुलगी बसमधून प्रवास करत असताना आरोपीने तिच्याजवळ उभे राहून तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडित मुलीने त्याला खडसावल्यानंतर त्याने तिच्यासोबत मनाला लज्जा उत्पन्न होईल, असं वर्तन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी घटनेच्या दिवशी सोमवारी साडेअकराच्या सुमारास बसने प्रवास करत होती. ती बसने एकेठिकाणी उभं राहून विस्डेन्ड थिएटर ते विश्रांतवाडी असा प्रवास करत होती. यावेळी संशयित आरोपी कंडक्टर पीडित मुलीजवळ येऊन तिला खेटून उभा राहिला. यादरम्यान दुसरीकडे उभा राहायला जागा नाही का? असा प्रश्न विचारत मुलीने कंडक्टरला चांगलेच खडसावले. यानंतर तिने तिकीट चेक करणाऱ्या अधिकाऱ्याकडे कंडक्टरची तक्रार केली. याचा राग आल्याने संशयित आरोपीनं फिर्यादी मुलीसोबत मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यानंतर बंडगार्डन पोलिसांनी आरोपी कंडक्टरला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.