बाबा घाणेरडा स्पर्श करतात! अल्पवयीन मुलीची धक्कादायक ऑडियो व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बिहारमधील छपरा या ठिकाणी वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सध्या एक ऑडियो व्हायरल झाली आहे त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आजीकडे तक्रार करत असल्याचे दिसत आहे. हि पीडित मुलगी अवतार नगर परिसरात राहत असून अकरावीच्या वर्गात शिकते. फेब्रुवारी 2019 पासून तिच्या वडिलांची वाईट नजर तिच्यावर होती. पण, ही मुलगी दहशतीत जगत होती. वडिलांच्या धाकामुळे तिने आपल्या मावशीलाही हे सांगितले नव्हते.

पीडितेच्या आईसोबतही तिच्या वडिलांचे संबंध चांगले नसल्याचे तपासात समोर आले आहे. पीडितेची आई बिहार पोलीस सेवेसाठी प्रशिक्षण घेत आहे. या पीडित मुलीचे वडील तिच्या आईला सतत मारहाण करत होता. या परिस्थितीतही ती माहेरच्यांच्या मदतीने पोलीस प्रशिक्षण घेत आहे. पीडितेची आई प्रशिक्षणासाठी निघून गेल्यानंतर काही दिवसांनी पीडितेच्या वडिलांची नजर आपल्या मुलीवर पडली. तेव्हा त्याने आधी तिच्याशी अश्लील बोलायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने अश्लील चाळेसुद्धा केले.

एका रात्री त्याने सगळ्या मर्यादा ओलांडल्याचे या पीडितेने सांगितले आहे. या सगळ्या प्रकाराला कंटाळून तिने आपल्या आजीला फोन लावला व घडलेला सगळा प्रकार सांगितला. पीडित मुलगी आणि तिची आजी यांच्या बोलण्याचा ऑडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यानंतर या पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच व्हायरल ऑडिओच्या सत्यतेची पडताळणी करण्यात येत आहे. पीडितेवर उपचार सुरू असल्याने तिच्या तक्रारीनंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment