हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्येएका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. अशावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पठाण यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
”वारिस पठाण यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की या देशात १०० कोटीहून अधिक हिंदू वास्तव्य करतात, म्हणून देशातील अल्पसंख्याक सुरक्षित आणि स्वतंत्र आहेत. कोणीही मुस्लिम देशातील अल्पसंख्याक समूहाचा अनादर करू शकत नाहीत. हिंदू समाज सहिष्णु आहे, सर्वांना सोबत घेऊन जातो, पण हिंदू समाजाच्या सहनशीलतेला त्याची कमकुवतपणा समजू नका. त्यांनी हिंदूंची आणि संपूर्ण समाजाची क्षमा मागितली पाहिजे.” असं म्हणत फडणवीस यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
वारीस पठाण यांच्या गुलबर्ग्यातील वादग्रस्त विधानानंतर पठाण यांच्याविरोधात पुण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे. याचसोबत आता कलबुर्गी पोलिसांनीही भारतीय दंड विधानाच्या कलम ११७, १५३ (दंगा भडकावण्याचा प्रयत्न) आणि कलम १५३ ए (दोन समूहांत घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न) नुसार पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, पक्षाचे पुढचे आदेश येईपर्यंत वारिस पठाण सार्वजनिक रुपात कोणतंही वक्तव्य करू शकणार नाहीत. तर, दुसरीकडे औरंगाबादचे खासदार व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितलेलं आहे.
महाराष्ट्र के पूर्व CM देवेंद्र फडणवीस: मुस्लिम देशों में अल्पसंख्यक इस तरह की बदज़ुबानी नहीं कर सकते। हिंदू समाज सहिष्णु है सबको साथ लेकर चलता है लेकिन हिंदू समाज की सहिष्णुता को उसकी कमजोरी न माने। उन्हें हिंदुओं और पूरे समाज से माफी मांगनी चाहिए। https://t.co/ppZOy0YdKt
— ANI_HindiNews (@AHindinews) February 21, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.